

सेलू : शेतात पडलेल्या जिवंत तारांच्या स्पर्शामुळे चराईसाठी गेलेली सात जनावरे विजेच्या धक्क्याने दगावली. घोराड परिसरातील जाखाळा शिवारात ही घटना रविवारी घडली. घोराड येथील अमोल महादेव तडस यांच्या मालकीची ही जनावरे मौजा जाखाळा शिवारातील शेतकरी घनश्याम माहुरे यांच्या केळीचे खोडव्याचे शेतात चरण्यासाठी नेले होते. शेतात तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या स्पर्शामुळे चराईसाठी गेलेली ही सातही जनावरे दगावली.
यात पाच गाई, एक वासरू, एक बकरीचा समावेश आहे. यावेळी जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या या वैभवला तारेचा स्पर्श झाला; पण तो दूर फेकल्या गेल्याने बचावला. यात त्याचे पायाला दुखापत झाली असून सात जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने कुणीही सरकारी कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही, हे विशेष ! जनाबरे शेताततशोच मृतावस्थेत पडून आहे. घोराड येथील पोलीस पाटील नीलेश गुजरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.