बस प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत! महिला सन्मान योजना; अंमलबजावणीस सुरुवात

वर्धा : राज्य शासनाने नुकतीच महिला सन्मान योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासामध्ये महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

योजनेंतर्गत सर्व महिलांना राज्याच्या हद्दीतपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये साधी, मिडी, निमआराम, वातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत) याबसेस मध्ये 50 टक्के सवलत राहील. सदरची सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बसेसकरीता लागू राहील. सवलत लागू केलेल्या दिनांकापूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येणार नाही. सर्व महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे, विन्डो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे, संगणकीय आरक्षणद्वारे तिकीट घेता येईल. 65 ते 75 या वयोगटातील महिलांना महीला सन्मान योजना हीच सवलत अनुज्ञेय राहील. तसेच 5 ते 12 वयोगटातील मुलींना पुर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत लागू राहील, असे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here