वर्धा : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत त्यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागून निधी गोळा केला असे वादग्रस्त विधान केले. या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक भुमीका घेत वर्ध्यातील बजाज चौकात येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. भीम टायगर सेनेच्या वतीने शनिवार (ता. १०) निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले.
बजाज चौक परिसरात भिम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा देत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक जाळून निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद… राजीणामा देत ‘माफी मागा, माफी मागा..’ अशा घोषणा देत पुतळ्याल जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी भीम टायगर सेनेचे विदर्भ प्रमुख अतुल दिवे, भीम टायगर सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल रामटेके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विशाल नगराळे, विद्यार्थी सेनाध्यक्ष अंकुश मुंजेवार, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, आर्वीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मेंढे, अहमद पठाण, प्रकाश कोरडे, बाबा बडगे, सुमीत गजभीये, सोनू सहारे, अमीत गजभीये, दीपक तागडे, आदर्श सांगोल, धम्मा शेलकर, नयन रामटेके, अंकुश गजभीये, आशीष दीघाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.