वर्धा : मुलाला मारल्याचा राग मनात धरून संतापलेल्या पतीने पत्नीस काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना धनोडी बहाद्दरपूर गावात घडली. याप्रकरणी १३ रोजी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यास्मीन शेख हिचा शाहरुख शेख याच्यासोबत २०१८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र,शाहरुख हा लग्नानंतर यास्मीनला घरगुती कारणातून मारहाण करायचा.
१२ रोजी मुलगा अंगणात खेळत असताना त्याने खोड्या केल्यामुळे यास्मीनने मुलाला थापड मारली. याचा राग मनात धरून शाहरुख याने पत्नी यास्मीन वाद करून शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी पायावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी १३ रोजी यास्मीनने पती शाहरुख विरुद्ध आर्वी पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.