पवनारात मित्रमीलन सोहळा उद्यासून आचार्य विनोबा भावे स्मृतिदिन : देशभरातील कार्यकर्त्याची उपस्थिती

पवनार : भूदान चळवळीचे प्रणेते, पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील ब्रह्मविद्या मंदिरात (परमधाम आश्रम) मंगळवार (ता. १५) ते गुरुवार (ता. १७) या कालावधीत मित्रमीलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देशभरातील शेकडो सर्वोदयी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या सोहळ्यात गांधी- विनोबांच्या मूलभूत विचार आणि संशोधनावर तसेच विविध विषयांच्या खोलात जाऊन विस्तृत, व्यापक चिंतनर-्चर्चा, सहसंवाद, अनुभवयुक्‍त मार्गदर्शन प्रवचन, मुक्‍तचिंतन, प्रदर्शन आदी पद्धतीने सर्वोदयी मित्रांमध्ये विचारांचे आदान-प्रदान होणार आहे, यावेळी विविध मान्यवर विचार व्यक्‍त करणार आहेत. मंगळवारी (ता. १५) पहारे चार वाजता जागरण, साडेचारल प्रार्थना, भजन-धून नदीत समाधिस्थळी प्रदक्षिणा, पाच वाजून २० मिनिटांनी वेदमंत्र, सकाळी सहा वाजता श्रमदान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here