वर्धा : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथे चुकीच्या उपचारामुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व भविष्यातही हा त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक मोठे ऑपेशन करावे लागणार आहे. त्याच्या सम्पूर्ण खर्च हास्पिटल रुग्णालय यांनी उचलावा यासाठी सतत पाच दिवसापासून उपोषण सुरू होते. त्याची दखल घेत उपोषण सोडवत सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.
याय बेमुदत उपोषणाला आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते नेते एकत्र येऊन समाजातील होत असलेल्या अन्याय विरोधात लढा देऊन अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना समर्थन करून अन्याय करणाऱ्याच्या विरोधात आवाज उचलण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत असलेल्या स्वाती आशिष गुजर यांच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम आंबेडकरी समाजातील लोकांनी केले.
त्याच बेमुदत उपोषनाची दखल घेत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथील मुख्य वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सय डॉ. मा.चंद्रशेखर महाकाळकर व सावंगी मेघे येथील ठाणेदार धनाजी जळक यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या मान्य करून उपोषण करते यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. त्याबद्दल समाजातील आंबेडकरी चवळीतील लोकांनी त्यांचे आभार मानले व ही लढाई आपल्या सर्वांच्या सहकार्य मुळे एकत्रित पणामुळे जिकलो असे त्यानी सांगितले.
यावेळी प्रामुख्याने किशोर भाऊ खैरकार, नीरजभाऊ गुजर, आशिष सोनटक्के, हर्षवर्धन गोडघाटे, विशाल शेंडे, नीरज ताकसाडे, अंकुश मुंजेवार, आशिष मेश्राम, आदेश संगोले, सचिन माटे, मनोज कांबळे, अमित शंभरकर, भीमा शंभरकर, नितीन इंदूरकर, महेंद्रभाऊ मुनेश्वर, सतीश इंगळे, विकी रामटेके, बबलू राऊत, बंटी रंगारी, तुषार पाटील, प्रजवल टेभरे, दीपक गेडाम, अक्षय पाटील यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.