श्वानाच्या मूत्राशयातून निघाले तब्बल 108 खडे; जिल्यातील पहिली व दुर्मिळ घटना

वर्धा : माणसांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या आजाराबाबत आपण नेहमीच ऐकत असतो पण माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येसुद्धा विविध आजार उद्भवल्याचे आढळून येते. पण या आजाराचे निदान लावणे व त्यावरून त्याचे उपचार करणे सोपी कार्य नव्हे. माणूस आपले दुःख व आजाराचे विश्लेषण डॉक्टरांसमोर मांडू शकतो. त्याला नेमका काय त्रास आहे हे बोलण्यातून व्यक्त करू शकतो. मात्र प्राण्यांमध्ये असे नाही. प्राणी आपले दुःख बोलून दाखवू शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे हे तितकेच कठीण कार्य आहे. त्यांच्या त्रासावरून व शरीर रचनेचे अध्ययन करून त्यांच्यावर पशुवैद्यकांना उपचार करावे लागतात.

यामध्ये सेवाग्राम येथील रवींद्र लावणे यांच्या मालकीची श्वान जस्सीला अचानक लघवी करतांना असहाय वेदना व्हायला लागल्या. लावणे यांनी लगेच वर्धेतील पशुवैद्य डॉ संदीप जोगे यांच्या दवाखान्यात तिला उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्या मूत्राशयाच्या एक्सरे घेण्याचे ठरविले व एक्सरे झाल्या नंतर तिच्या मूत्राशयात मोठे खडे असल्याचे निदान लागले म्हणजेच तिला bladder stone असल्याचे कळले. व त्यांनतर डॉ संदीप जोगे यांनी तिची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. व शस्त्रक्रिये दरम्यान तिच्या मूत्राशयातून तब्बल 108 खडे डॉक्टरांनी अत्यंत बारकाईने यशस्वी रित्या बाहेर काढले.

माणसांमध्ये अश्या प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्य आहे. मात्र असे असले तरी एखाद्या प्राण्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येत खडे निघण्याची ही जिल्यातील पहिली व दुर्मिळ घटना आहे. या शास्त्रक्रिये दरम्यान रोहित दिवाने, दीप जगताप, रेश्मा गणवीर, इशा खुरपुडे यांचे सहकार्य लाभले. सदर यशस्वी शस्त्रक्रिये नंतर जस्सीला तिच्या वेदनापासून मुक्ती मिळाली आहे व सद्यास्थितीत ती सुदृढ अवस्थेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here