वर्धा : दिवाळी सणानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्री परवाना दिला जाणार आहे. मात्र, विनापरवाना फटाक्यांची विक्री करताना आढळून आल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परवाना घेऊनच फटाक्यांची विक्री व स्टॉल्स लावावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरात विनापरवानगी फटाका विक्रीचे स्टॉल्स उभारले जातात. तसेच फटाक्यांची विक्रीही केली जाते. मात्र, विनापरवानगी फटाका विक्री केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून रीतसर परवानगी काढूनच फटाका विक्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावरही विनापरवानगी फटाक्यांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री होताना दिसून येते. इतकेच नव्हे तर काही दुकानांमध्येही फटाक्यांची विनापरवानगी फटाका विक्री होताना दिसून येत असल्याने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.