वर्धा : दिवसेंदिवस प्लास्टिकचा अवास्तव वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा होत असून प्रदुषण वाढत आहे. परिणामी केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार एकल वापर प्लास्टीक वापरावर 1 जुलै , 2022 पासून संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. परिणामी कोणीही सिंगल युज प्लास्टिक विकताना किंवा वापरताना आढळून आल्यास त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. त्यामुळे आता 1 जुलै 2022 पासून कोणीही सिंगल युस प्लास्टीक विकताना किंवा वापरताना आढल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्लास्टीक वापरामुळे कचरा जमा होत असून हे प्लास्टीक नाल्यांमधील पाण्यात वाहून जाते. यामुळे नाल्या तुंबत आहे. तुंबलेल्या नाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसून नाल्यातील कचरा रस्त्यावर ओसंडून वाहातो. त्यामुळे घाण पाण्यामुळे पर्यावरण प्रदुषित होत असते. नाल्यांमध्ये प्कास्टिकचा कचरा साचल्याने रस्ते पाण्याने भरुन वाहत असतात. या सर्वांपासून मुक्ती मिळावी यासाठी एक जुलैपासून सिंगल प्लास्टिकचा वापर करता येणार नाही.