वर्धा : शेतक-यांनी १०० मि.मि. पाऊस पडल्याशिवाय व बियाण्याची विजप्रक्रीया केल्याशिवाय पेरणी करू नये तालुका कृषि अधिकारी, वर्धा यांचे आवाहन आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाच्या वतीने वर्धा जित २५ जून से जुने २०२२ या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेचा कालावधी खरीप पिकाच्या दृष्टिने महत्वाचा असल्याने या कालावधीत मोहीमेद्वार कृषि विभागाचे अधिकारी व कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ शेतक-यांच्या बांधावर जाऊन नविन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करतांना शेतक-यांना या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबतची माहिती देणार आहे.
या मोहीमे अंतर्गत मोजा नांदोरा ता. वर्धा येथे दिनांक २६ जुन २०२२ रोजी महिलांची शेतीशाळा आयोजीत करण्यात आली. सदर शेतीशाळेमध्ये श्री पि.ए. घायतडक तालुका कृषि अधिकारी वर्धा यांनी बियाण्यास विजप्रक्रीया कशी करावी व त्याचे फायदे, विविएफ व टोकन पध्दतीने सोयाबीन लागवडीचे फायदे, शेतीतील रासायनिक खत व किटकनाशकावर लागणारा उत्पादन खर्च कमी करणे, फेरोमन ट्रप्स व चिकट सापळ्यांचा वापर करणे, पक्षी थांव उभारणे व त्याचे फायदे इत्यादि बाबन उपस्थित महिना शेतीशाळेतील शेतक-यांना मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना आत्मा अंतर्गत परसबागेमध्ये भाजीपाला लागवडीकरीता भाजीपाल्याचे मिनीकीट वाटप करण्यात आले.
शेतीशाळेमध्ये उपस्थित महिलांपैकी श्रीमती स्मिता कुकडे यांनी निवाळी अर्क तयार करण्याची पध्दत व त्याचे महत्व तसेच श्रीमती अर्चना बटाले यांनी जिवामृत तयार करणे, बेल रसायन व भस्म रसायन तयार करण्याची पध्दती व त्याचे महत्व याबाबत माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले हे विशेष. नांदोरा गावातील पोलीस पाटील श्री प्रभाकर बहादुरे यांचे शैतान शिवार फेरी आयोजीत करून कुपनी राजेश ऋषि यांनी उपस्थित महिलांना माती नमुना कसा काढावा व त्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रंजना धानखेडे कृषि सहाय्यक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री कुणाल बुलकुंडे विटीएम (आत्मा) यांनी केले.