आष्टी : नदीवरील रेती काढण्याच्या बहाण्याने नेऊन चार गावगुडांनी नीलेश भीमराव वानखडे (वय 40) यांचे हातपाय बांधून विषारी औषध पाजले. धक्कादायक घडना आष्टी तालुक्यातील अंतोरा येथे 27 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान घडली. नीलेश वानखडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंतोरा येथील फिर्यादी कांता भीमराव वानखडे (वय 60) रा. जुना अंतोरा या घरी आपल्या दोन मुलांना जेवण वाढत होत्या. दरम्यान, आरोपी आकाश तायवाडे ब राजेंद्र ठाकरे हे दोघेही दारूच्या नशेत कांता वानखडे यांच्यासमोर येवून शिविगाळ करून मारण्याची धमको देत गोंधळ घाळत होते. तेवढ्यात नीलेश वानखडे याने हटकले असता दोघांत वाद निर्माण झाला.
त्यानंतर घरातून हाकलण्याच्या कारणावरून या दोघांनी नीलेश वानखडे याला संपविण्याचा बेत आखला. 27 एप्रिल रोजी आरोपी राजेंद्र ठाकरे व भैय्या हरले यांनी नीलेश वानखेडे यांच्या घरी येवून वर्धा नदीतून रेती काढण्याच्या कामासाठी घेऊन गेले. गावातील अंगणवाडी परिसरात चार जणांनी नीलेशला मागील बाजूस तोंड दाबून नेले, आधी हात आणि नंतर दोन्ही पाय बांधून एकाने नाक दाबून विषारी औषध पाजले. त्यानंतर चौघेही घरांच्या दिशेने पळून गेले. नीलेश भौमराव वानखडे हा ओकाऱ्या करीत रस्त्यावर कसाबसा आला. शेतात जाणाऱ्याला ओरडण्याचा आवाज येताच त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर सदर शेतकऱ्याने नीलेश बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी काही क्षणातच घटनास्थळ गाठून नीलेशचे हातपाय सोडून चारचाकी वाहनाने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले.