पवनार येथे कारचा भीषण अपघात! मामा भांज्या दर्ग्याजवळची घटना; चार गंभीर जखमी

पवनार : भरधाव वेगाने नागपुरच्या दिशेने जानार्या कारचा सामोरील टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन डिव्हायडर वरुन पलटी होत विरुद्ध दिशेने येणार्या कारवर जाऊन आदळली यात कारमध्ये असलेले सात जन जखमी झाल्याची घटना रविवार (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमाास मामा भांजा दरग्याहजवळ घडली. या अपघातात तीन गंभीर जखमी झाले. जखमींना बसापाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकावार, अनोमदर्शी भैसारे, दीपक भगत, दिनेश वाणी, राहुल काशीकर, दैनिक सकाळचे बातमीदार राहुल खोब्रागडे यांनी तात्काळ रुग्णवाहीकेत टाकुण सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले.

एमएच ३२ एएस ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून नागपूरकडे जातं होती. दरम्यान पवनार येथील मामा भांज्या दर्ग्याजवळ अचानक चालत्या वाहनाचा कारचा उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला आणि रोडच्या मध्यभागी असलेल्या डीवाईडरवरून पलटी होऊन विरुद्ध दिशेने नागपूरकडून माहूरला जातं असलेल्या एमएच ४० सीए ४२६७ क्रमांकाच्या कार वर जाऊन आदळली. या कारमध्ये असलेले रमेशराज कपाटे वय ६० वर्षे, शिलाबाई कृष्णराज कपाटे वय ५५ वर्षे, चेताबाई कपाटे वय ७० वर्षे, कोमल कृष्णराज कपाटे वय २१ वर्षे, योगेश कपाटे वय २५ वर्षे सर्व राहनार पारशीवणी जिल्हा नागपुर हे गभीर जखमी झाले. मात्र नागपुरकडे जानार्या कारमधील दोन जखमींची नावे कळू शकली नाही.

घटना घडताच या मार्गाने जाणार्या नागरीकांनी तात्काळ रुग्णवाहीकेला बोलवत या सर्व जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. मात्र यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने कपाटे कुटींबीयांना नागपुर येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले. हा अपघातात इतका भीषण होता की, यातील दोनीही कारचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहीती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली असून सेवाग्राम पोलिस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here