जिल्ह्याचे तापमान 43 अंशांवर! विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्‍यता

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा कमी वाटत असतानाच शनिवारी पुन्हा तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियस नोंदविला गेला. त्यामुळे येत्या काही दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट येईल काय, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांत तापमान कमी अधिक नोंदविले जात असून, वर्धेकरांना उन्हाचे चटके सोसत कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे.

विदर्भासह उष्णतेची तीव्र लाट येणार असून, पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील तापमान 40.5 अंशावर स्थिरावले असताना शनिवारी थेट 43 अंश सेल्सियस ऐवढे नोंदविण्यात आले. त्यामुळे मार्चपासूनच एप्रिल महिन्यातही वर्धेकरांना मे-हिटचा अनुभव येत आहे. विदर्भात दुस-या क्रमांकाचे तापमान वर्धेचे नोंदविल्या जाते. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातील ढगाळ वातावारण अर अधूनमधून अवकाळी पाऊस यामुळे तापमानाचा पारा घसरला होता. मात्र, होळीच्या प्रारंभीच सूर्य आग ओकू लागला. त्यानंतर एप्रिलच्या दुस-या आठवड्यात तापमान घसरले वाटत असतानाच पन्हा वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here