हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुटकी गावाशेजारी असलेल्या वनविभागाच्या पडीत जागेवर रविवारी दुपारी अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच तारांबळ उडाली होती. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठी अनुचित घटनाच टळली.
कुटकी गावाशेजारी वनविभागाची पडीत जमीन असून, या जमिनीच्या बाजूला काही व्यक्तींची घर आहेत. रविवारी दुपारी वनविभागाच्या जागेवरील वाळलेली पाने अचानक जळत असल्याचे लक्षात येताच त्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देत अग्निशमन विभागाला दिली. एक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे. आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने लाखोंची वनसंपदा थोडक्यात बचावली.