वर्धा : केंद्रीय मोटार वाहन नियम २३ वी सुधारणा २०२१ नुसार पंधरा वर्षे जुन्या वाहनांच्या पुनर्नोदनी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीची अंमलबजावणी १ एप्रिलपासून जिल्ह्यात केली जाणार असून जुन्या शुल्कात जुन्या वाहनांची पुनर्नोदणी करण्यासाठी वाहनचालकांना ३१ मार्च हा अखेरचा दिवस आहे. एकूणच शुल्कवाढीचा भुर्दंड आता नागरिकांना सोसावा लागणार आहे. पंधरा वर्षांनंतर प्रत्येक वाहनाची पुनर्नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. तसा नियमही आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन स्कॅप पॉलिसी जाहीर करीत पंधरा वर्षे जुन्या वाहनांच्या पुनर्नांदणी शुल्कात मोठी वाढ केली आहे. ही शुल्कवाढ येत्या १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.
Home ◼️ संपादकीय लागू होणार वाढीव पुनर्नोंदणी शुल्क! सोसावा लागेल अधिकचा भुर्दंड; बचतीचा आजचा अखेर...