वर्धा : खासगीकरण आणि धोरणांमुळे संतप्त झालेले बँक कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील नॅशनल लाइन बँकांच्या 91 शाख्त्रांमधील 500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांचे कामकाज प्रभावित झाल्याने तब्बल 400 कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे.
देशभरातील कामगार संघटनांनी दोन दिवस संप करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचाऱ्यांनीही वरील संपात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. या शिवाय भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कर्मचारीही संपात सहभागी आहेत. संपात सहभागी असलेल्या कर्मचा-यांनी काही ठिकाणी निदर्शनेही केली. ऑल इंडिया बँक एप्प्लॉइज असोसिएशनच्या आवाहनानुसार बँक कर्मचारी युनियनने संप यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता इतर सर्व राष्ट्रीय स्तरावरील लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी बँक संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे बँकांमधील मार्च एंडिंगचे काम पूर्णत: प्रभावित झाले होते.