वर्धा : घराच्या कंपाउंडमध्ये बसलेली कोंबडी हाकलली म्हणून शिवीगाळ करून एकास लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार 26 मार्च रोजी सांयकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी गजानन किसनराव लोकडे रा. भाईपूर पुनर्वसन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू गोदडे, वंदना गोदडे, अंकुश गोदडे, नीलेश गोदडे चारही रा. भाईंपूर पुनर्वसन ता. आर्वी यांच्याविरुद्ध आर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.