हिंगणघाट : हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार कापसाला विक्रमी 12 हजार 11 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपासून कापसाच्या दरात दररोज वाढ होत असल्याचे दिसून येते. शक्रवारी जिल्ह्यातील सेल बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल 12 हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. तर दुसऱ्या दिवशी हिंगणघाट बाजार समितीत 12 हजारांचा पल्ला गाठला आहे. या घडीला कापसाला चांगला दर मिळत असला तरी अल्प शेतक-यांकडे कापूस उपलब्ध आहे. त्यामुळे भाववाढीचा फायदा शेतक-यां ऐवजी व्यापा-याना मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काही दिवसांत कापसाचे दर अणखी वाढतील, अशी शक्यता आहे.