वयोवृद्धेने केली विहिरीत उडी घेत आत्महत्या! आजारपणाने झाली होती त्रस्त

तळेगाव (श्या.पंत.) : येथील जुन्या वस्तीतील पाणंद रस्त्यालगतच्या विहिरीत आजाराने त्रस्त असलेल्या एका ७५ वर्षीय महिलेने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लीला सुधाकर फसाटे (रा. जुनी वस्ती, वॉर्ड 3 तळेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

शेतकरी सुधाकर लोखंडे यांनी उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीवरील कृषिपंप सुरू केला. दरम्यान, विहिरीतील पाणी कमी झाले, अशातच विहिरीत महिलेचा मृतदेह असल्याचे लोखंडे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थांना माहिती देत पोलिसांनाही कळविले, माहिती. मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर आणि पोलीस शिपाई नीतेश वाघमारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here