वर्धा : कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने मराठी दिवस म्हणून साजरा करतात जय महाकाली शिक्षण संस्था, लॉयन्स क्लब गांधी सिटी, किरण बहुद्देशीय सेवा संस्था व राजभाषा मराठी महोत्सव आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवस राजभाषा मराठी महोत्सव अग्निहोत्री कॉलेज परिसर रामनगर येथे 26, 27, 28 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. हा मोहत्सव साहित्य कला व लेखकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
यामध्ये तीन दिवस व्याख्यान, नृत्य, नाट्य, गायन व काव्य वाचन, ढोल ताशा वादन, लेझीम सादरीकरण, क्रीडा सादरीकरण असे विविध कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रम उदघाट्न प्रसंगी पंचवीसशे स्केअर फूट भव्य रांगोळी वर्धेचे सुप्रसिद्ध रांगोळीकार आशिष पोहाणे व त्याच्या संपूर्ण टीम सागर पेरके, सुभाष जगताप, राजीव बन्सी, माधुरी तडस, करिष्मा जालान, स्वाती चुटे, अमन तडस, प्रज्वल तराळे, वैदही चुटे, किमया पोहाणे यांनी सतत दहा तास अथक परिश्रमाने विविध रंगच्या माध्यमातून साकारली.
याकरिता ऐकूण चारशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. या रांगोळीच्या माध्यमातून विविध गाजलेल्या पुस्तकाची नावे व अनेक लेखकांची नावे या रांगोळीमध्ये रेखाटण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी दुपारी 5 वाजता सुप्रसिध्द गझलकार नविन देशमुख यांच्या काव्यमैफिलिने महोत्सव रंगणार असून डॉ. मंजुषा सावरकर व मोहन शिरसाट यांच्या व्याख्यानाचे आयोजन पंडीत शंकरप्रसाद अग्निहोत्री, मोहनबाबू अग्रवाल, अभ्युदय मेघे, डॉ. सतिश पावडे, डॉ. रत्ना नगरे, अनिल नरेडी, संदीप चिचाटे, प्रदीप कडू, संजय तिगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप सुर नवा ध्यास नवाचे विजेता अनिरुद्ध जोशी व सूरश्री सानिका बोभाटे तसेच जीवन बांगडे व दिलीप रोकडे यांच्या साथसंगतीने संगीत मैफिल संपन्न होणार आहे.