वर्धा : कर्नाटकमधील शिमोगा येथे बजरंग दलाच्या हर्ष नामक कार्यकर्त्याची निघृण हत्या करण्यात आली. त्या हत्येच्या निर्षेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहून निषेध व्यक्त करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली.
ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. प्लाँपुलर फ्रंट आँफ इंडिया, कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमोक्रँटिक पार्टी आँफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे.
भारतात घडलेल्या 1946 च्या डायरेक्ट अँक्शन चवळळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई व आरोपींना जरब बसावी, अशी शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. प्लाँपुलर फ्रंट आँफ इंडिया, कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमोक्रँटिक पार्टी आँफ इंडिया या संघनेवर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद संघटनेच्या वतीने निवेदनातून दिला आहे.
यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक बबलू राऊत, अटल पांडे, गुड्डू ठाकूर, मुन्ना यादव, किरण उपाध्याय, अनिल कावळे, राजेंद्र पुरोहित, मदन परसोडकर, प्रशांत यादव, यांच्यासह आदीची उपस्थिती होती.