वर्धा : धाम नदीवरून सेवाग्राम स्थानकावर मध्य रेल्वेने टाकलेली बिडची पाण्याची पाइपलाइन फोडून विक्री करणाऱ्या तीन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. धाम नदीवरून सेवाग्राम स्थानकावर मध्य रेल्वेने टाकलेली बिडची पाण्याची पाइपलाइन फोडून धातू चोरी केल्याची नोंद रेल्वेच्या सेवाग्राम चौकीमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर निरीक्षक विजयकुमार त्रिपाठी आणि उपनिरीक्षक के. एन. राय यांना निर्देश दिले होते. त्यानुसार 4 जानेवारीला माहिती वरून सदर चोरट्यांना रंगेहात पकडले.
चोरांनी हातोड्याने फोडले आणि तुटलेले तुकडे गोण्यांमध्ये भरले. दोन्ही पंचांसमोर चौकशी केल्यावर सर्वांनी रेल्वे मालमत्तेच्य चोरीचा गुन्हा कबूल केला. उपनिरीक्षक के. एन. राय यांनी तुटलेले तुकडे 4 गोनींमध्ये भरून पंचांसमोर आणले. त्याचे वजन 200 किलो (8 हजार) इतके होते. जप्ती पंचनामा अंतर्गत एक हातोडा आणि एक गायटी जप्त केली. सदर चोरट्यांनी चोरी केलेले पाईप त्याच्या इतर दोन साथीदारांसह वर्धा येथील भंगार दुकानात विक्री केले. सदर आरोपींना अटक करून बुधवारी तिन्ही आरोपींना दिवसांच्या रेल्वे पोलिस कोठडीसाठी न्यायालयासमोर हजर केले जाईल.