ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्याने निर्बंध

वर्धा : ओमायक्रॉनसह डेल्टाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने तसेच येत्या काळात सण, उत्सवामध्ये नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता पाहता शासनाने नव्याने निर्बंध लागू केले आहेत. सदर निर्बंधाची जिल्ह्यातही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतारयांनी दिले आहेत.

नव्या नियमावलीप्रमाणे जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई राहील. लग्न समारंभात शंभर लोकांनाच उपस्थित राहता येईल. समारंभ मोकळ्या जागेत असल्यास २५० व्यक्ती किंवा क्षमतेच्या २५ टक्के लोकांना उपस्थित राहता येतील. सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा कार्यक्रमांनाही उपस्थितीचे हेच निर्बंध असतील. अन्य समारंभास क्षमतेच्या५० टक्के तर मोकळ्या ठिकाणी २५ टक्के उपस्थितीचे बंधन राहील. क्रीडा स्पर्धानाही २४ टक्केची मर्यादा असेल. उपाहारगृह, चित्रपट व नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे ५७० टक्के उपस्थितीचे निर्बंध लागू राहतील. उपाहारगृहांची क्षमता निश्‍चित करून मालकांना तसा फलक दर्शनी भागावर लावावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here