हेलिकाॅप्टर अपघातात CDS जनरल बिपीन रावत यांचे निधन


नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडूतील कुन्नूर येथे अपघाती निधन झाले. ते व्हिआयपी हेलिकॉप्टरने कोईंबतूरहून दिल्लीला निघाले होते. मात्र कुन्नर येथे पोहचल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

अपघात झाला त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले.

सीडीएस बिपिन रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली. आता त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या. देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here