कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार! तळेगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोरील घटना

वर्धा : कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान अप्पर वर्धा पाटबंधारे विभाग कार्यालयासमोरील अमरावती- नागपूर रोडवरील कटआऊट येथे घडली. यातील मृतक हा 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45 वाजता दुचाकी क्रमांक एमएच 29 टी 6573 ने मौजा तळेगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोरील अमरावती- नागपूर रोडवर तळेगाव रस्त्याने जात होता. दरम्यान मागाहून येणाऱ्या अज्ञात कारचालकाने जोराची धडक दिली. त्यामुळे तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात भर्ती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here