हिंगणघाट : कोरोनाकाळापासून रेल्वे पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरु केल्या नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे नागपूर-काझीपेठ, बल्लारशाह- भुसावळ पॅसॅजर त्वरीत सुरु करावी, या मागणीकरिता युवासेनेच्यावतीने हिंगणघाटमध्ये मुंडन आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडे वांरवार मागणी करुनही पॅसॅजर रेल्वेगाड्या सुरु करण्याकरिता पुढाकार घेतला जात नाही आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दड सहन करावा लागत आहे. आता सर्व सुरळीत सुरु असतानाही पॅसेंजर गाड्या सुरु करण्याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये युवा सेना शहर प्रमुख भुषण राजु कापकर, सचिव पवन गेडाम, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा नलिमी सयाम, संगीता कडू, सामाजिक कार्यकर्ता श्याम इडपवार, संदीप साळवे, श्याम येडणे, राहुल आत्राम, सोनू चाफेकर, विशाल देवतळे, सुनील आष्टीकर, अक्षय ठाकूर, साई वर्मा, प्रदीप महाकाळे, अपित साळवे, चांद राजू रेह्टी, मोहन जोशी, गजू बेले, निलेश गणेश शाहू, नागेश टिंगरे, कुमार चव्हाण, उद्धेश टिंगरे, आकाश शंभरकार, धर्मा जोशी, नयन दंडवते, विनोद मोहद, किशोर इगोले यांच्यासह युवा सैनिक, शिवसैनिक व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.