हिंगणघाट : राज्यात गाजलेल्या प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणी बुधवारी (ता. एक) शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. गुरुवारी (ता. दोन) सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम शहरात दाखल झाले असून, न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता.
ॲड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद सादर केला. गुरवारी पुन्हा प्रक्रिया सुरू राहणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने आपला युक्तिवाद सादर करतील. खटल्याचे कामकाज आता जवळजवळ संपुष्टात आले असून, लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. आज कामकाजाच्यावेळी न्यायालयीन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता.