समुद्रपूर : मांडगाव लगतच्या वना नदी पात्रातील शिवणी घाटात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. शंकर रामाजी जोगे (१३), असे मृत युवकाचे नाव आहे. गावात हळदीचा आणि तेरवीचा कार्यक्रम सुरु होता. दरम्यान गावातील मुले आणि पाहुणे मंडळी कडील मुले नदीत पोहण्यासाठी गेले होते.
आदित्य जोगे (२१) आणि त्याचा नागपूर येथील मीत्र विशाल शिवाने (वय २३) हे दोघे हळदीचा कार्यक्रम आटोपून नदीवर आंघोळीला गेले. त्यांच्या सोबत आर्यन सातघरे (वय १४), शंकर रामाजी जोगे (वय १३), सुजल दाते (वय १६) ही तीन बालक पोहायला गेले. आदित्य हा नदीत पोहत होता. सोबतच या तीनही बालकांनी नदीत उड्या मारल्या. नदीत खोळ खड्यात पाण्याचा अंदाज आला नसल्याने तिघेही पाण्यात बुचकाड्या खाऊ लागले. आदित्यला दोघांना वाचविण्यात यश आले. शंकर जोगे खडुयात बुडाला. या घाटातील रेती उपशायामुळे २० फुट खोळ खड्डा होता. यात शंकरचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील गणेश तडस, मंडळ अधिकारी बागडे, तलाठी बरबट, दिगांबर तडस यांनी संबधितांना माहिती दिली. भीमराव जोगे, बींजु पवार यांच्या मदतीने सर्च मोहीम राबविण्यात आली.