वर्धा : दिवाळीच्या दिवसांमध्ये एकदम गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हयात दिवाळी काळासाठी प्रशासनाकडून कोरोना नियमावली जाहीर करण्यात आली. नियमावली प्रमाणे दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादीत राहील याची दक्षता घेण्यात यावी असे कळविण्यात आले आहे.
खरेदीसाठी दुकाणे व रस्त्यांवर गर्दी टाळावे, जेष्ठ नागरिक व बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, मास्क् व सुरक्षित अंतराचे पालन करावे. फटाक्यांमुळे वायु व ध्वनीप्रदुषण होतो. कोरोना झालेल्या व होऊन गेलेल्या नागरिकांना धुरामुळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्यास टाळावे.
शासनाने बरेच निर्बंध शिथिल केले असले तरी मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम आहे. त्यामुळे दिवाळी दरम्यान दिपावली पहाट सारखे कार्यक्रम आयोजित करतांना नियमाचे पालन करावे. शक्यतोवर अशा कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक यामाध्ययमाव्दारे करण्यात यावे.
सांस्कृतिक कार्यक्रमा ऐवजी रक्तदानासारखे शिबिर घेण्यात यावे. तसेच कोरोना, मलेरिया, डेग्यु इत्यादी आजार तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. यासाठी मोठयाप्रमाणात एकत्रित येऊ नये. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या वेगवेगळया विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमाचे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिका-यांनी कळविले आहे.