पथदिव्यांचे कनेक्शन कापल्याने रोष! महावितरणाविरूद्ध सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन

वर्धा : स्ट्रीटलाइटचे विद्युत कनेक्शन कापणे बंद करावे व ग्रामपंचायतीची थकबाकी महावितरणने त्वरित भरावी, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र ड च्या अपात्र यादीचे फेरसर्वेक्षण करावे व वंचित लाभार्थी प्रपत्र ड मध्ये समाविष्ट करावे, ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगाचे बँक खाते राष्ट्रीयक्रत बँकेतच ठेवावे, वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी तसेच सर्व ग्रामपंचायतीचे स्ट्रीट लाइट सोलरवर जिल्हा परिषदेने करून ह्यावे, आदी विविध मागण्या करण्यात आल्या.

या धरणे आंदोलनात सरपंच संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष धमेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष संदिप डोबळे, जगदिश संसारिया, तुषार पेंढारकर, धीरज लेंडे, जिल्हा सचिव राजेश सावरकर, सचिन गावंडे, अनंत हटवार, सरचिटणीस अतुल तिमांडे, विधानसभा अध्यक्ष गजानन भोरे, रेणुका कोंटबकर, राजश्री गावंडे, अरुण चौधरी, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोके, अंकित कावळे, दिलीप हिंगणेकर, प्रांजल येंडे, प्रतिभा माऊसकर, रोशन दुधकोहळे, किशोर नेवळ, अमोल बुरिले यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here