वर्धा : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचा शुभारंभ सकाळी 7.00 वा. विश्वविद्यालयातील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल करतील. प्रो. शुक्ल यांनी या रॅलीनिमित्त जारी केलेल्या संदेशात देशाचे एकीकरण व पर्यावरणाचे सरंक्षण यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
ही रॅली वर्धा शहरातील विविध महत्वाच्या चौकातून जाईल. रॅलीचा समारोप मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सकाळी 9.30 वा. करण्यात येईल. या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन कुलसचिव कादर नवाज खान यांनी केले आहे. या रॅलीचे संयोजक शिक्षण विभागाचे सहायक प्रोफेसर श्री अनिकेत आंबेकर तसेच जनसंचार विभागाच्या सहायक प्रोफेसर डॉ. गीता शाहू असतील.
ही रॅली वर्धा शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक (आर्वी नाका), छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, सुभाषचंद्र बोस चौक (जिल्हा सामान्य रूग्णालय), जमनालाल बजाज चौक, लाल बहादुर शास्त्री चौक या मार्गाने जाईल. रॅलीचा समारोप सकाळी 9.30 वा. विश्वविद्यालयातील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर होईल. सायकल रॅलीच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. या रॅली मध्ये शैक्षणिक, गैर-शैक्षणिक अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी, विद्यार्थी यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.