वर्धा : अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या मौलाना समी उल्हाह खा अ. हमीद याच्यावर कठोर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना सादर करण्यात आले.
आरोपीने केलेले कृत्य निंदनीय असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने घटनेचा निषेध करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, साबीर पठाण, चंद्रशेखर घोडे, विशाल हजारे, अभिजित चौधरी, प्रभाकर धोटे, प्रथमेश हांडे, रोहित ताजने, मंगेश खेडकर, सुनील मोहोड, महेश जगधने, सादिक परवेज शेख, राहुल सुरकार, नंदकुमार कांबळे आदींची उपस्थिती होती.