सिंदी (रेल्वे) : कोविड मुळे मागील दोन वर्षांपासून बंद पडलेली शहरातील रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्षा बबिता तुमाने आणि नगरसेवक, प्रवाशी मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी (ता. १५) स्थानिक रेल्वे स्टेशन मास्टर व्दारा डीआरएम नागपूर विभाग यांना देण्यात आले. तात्काळ रेल्वे सेवा सुरू झाली नाही तर सिंदीवासीयांच्या सहकार्याने जनआंदोलन उभारण्याचा खळमळीत इशारा निवेदणातुन नगराध्यक्षा बबिता तुमाने यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
सिंदी शहरात जाण्यायेण्यासाठी प्रमुख सोय म्हणून रेल्वे सेवेचा मोठा आधार आहे. शहरातुन शिक्षणासाठी वर्धा नागपुरला जाणारे विद्यार्थी, माल खरेदीसाठी जाणारे व्यापारी वर्ग, कामधंद्यासाठी जाणारे नौकरदार आदीची मोठी संख्या आहे या सर्वाना रेल्वेने प्रवास करने सोयीचे आणि आर्थिकदृष्ट्या झेपणारे आहे. शिवाय सिंदी शहर दोन्ही महामार्ग पासून अनुक्रमे सात आणि दहा किलोमीटर दुर असल्याने वाहनाची उपलब्धता आणि आर्थिक बाजुने परवडणारे नाही परिणामता रेल्वे बंद असल्यांने या सर्वाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
शिवाय सिंदी रेल्वे शहराची ओळखच सिंदी “रेल्वे” म्हणुन आहे आणि मागील दोन वर्षांपासून रेल्वेच बंद असल्यांने शहराचा आत्माच निघाला आहे. करीता शहराची प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षा बबिता तुमाने यांनी रेल्वे प्रशासनाला तात्काळ रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी एका निवेदनाव्दारे केली आहे. शिवाय रेल्वे सेवा सुरू झाली नाही तर सिंदीवासीयांच्या सहकार्याने जनआंदोलन उभारण्याचा खळमळीत इशारा सुध्दा यातुन रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
निवेदन शुक्रवारी (ता. १५)सिंदी रेल्वे स्टेशन मास्टर एस. जी. पाटील यांच्या मार्फत डीआरएम नागपूर विभाग यांना देण्यात आले. यावेळी सिंदी नगर पालीकेच्या अध्यक्षा बबीता तुमाने, काग्रेसचे गटनेता आशिष देवतळे, नगरसेवक विलास तळवेकर,अकील शेख, ओमप्रकाश राठी, जयश्री सिरसे, प्रवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष गुल्लू भन्साली, मनिष कुंभारे, आनंद छाजेड, सचिन गुल्हाने, राहुल कलोडे, धनराज झिलपे, अनिल साखळे, स्नेहल कलोडे, अनिल साठवने, नरेंद्र सोनपितळे, रमेश वडांद्रे आदीची उपस्थिती होती.