वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालवात उपचार घेत असलेल्या रुग्णाने चक्क बेडवरील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडल्याने रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली आहे.
बाबू त्यागराज शेट्टीवार (५९, रा. काचीपुरम तामिळनाडू) असे मृताचे नाव आहे. बाबूचा रेल्वेने प्रवास करताना अपघात झाला होता. त्याला १० ऑक्टोबर रोजी सेवाग्राम येथील रुग्णालयात अपघात विभागात अतिदक्षता विभागात उपचारार्थ भरती करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्याने त्याच रात्री ९ वाजताच्या सुप्नारास बेड क्रमांक आठच्यावर असलेल्या पंख्याला चादरीने बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुदाम सुरजुसे, पवन बाभूळकर करीत आहे.
हलगर्जीपणाने घेतला जीव; नागरिकांत चर्चा
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय हे २४ तास सेवा देतात. मग बाबूने आत्महत्या करताता कुणीच कसे पाहिले नाही, हा प्रश्न उभा होतो. बाबू टेबलवर उभा होऊन त्याने टॉवेल पंर्याला बांधून गळफास घेतला हे सर्व होत असताना कुणालाच कसे रोरवता आले नाही, जर परिचारिका, डॉक्टर अलर्ट असते तर बाबूचा जीव वाचला असता. डॉक्टरांस परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळेच बाबूचा जीव गेल्याचा आरोप तेथील नागरिकाकडून करण्यात आला.