वर्धा : घरासमोर गणपतीचे भजन म्हणणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करीत त्यास जखमी केले. गॉडप्लॉट परिसरात ही घटना घडली. विजय सुधाकर परतेकी हा प्रफुल्ल गिलबे याच्या घरासमोरील पायरीवर बसून भजन म्हणत असताना गोपाल शर्मा हा आला.
तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने विनाकारण शिवीगाळ करून भजन म्हणण्यास हटकले. विजयने शिव्या देण्यास मनाई केली. असता संतापलेल्या गोपालने ब्लेडने गालावर, हातावर सपासप वार करून जखमी केले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.