वर्धा : परिसरातील समृध्दी महामार्गाचे गेल्या दोन वर्षापासुन काम सुरु आहे. या कामाकरीता परिसरातील महाकाळ-सुरगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात या कामावरील जड वाहनांची रहदारी सुरु आहे परिणामी हा कच्चा रस्ता पुर्णपणे उखडल्याने रोडची पुरती चाळणी झाल्याने या रस्त्यानेन जाने आता कठीण झाले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी महाकाळ येथील सरपंच सुरज गोहो यांनी केली आहे.
या महामार्गाच्या कामाकरीता मोठ्या प्रमाणात जड वाहणाची रहदारी या रस्त्यावरुन सुरु असल्यामुळे महाकाळ-सुरगाव डांबरिकरण रस्त्याला मोठमोठे खड्डे पडुन पांधनीचे स्वरुप आले असुन दोन्ही गावातील या रस्त्यावरील वाहतुक तसेच शेतकर्याना शेती करण्याकरिता खुप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्यामुळे रस्त्याची पाहणी करुन सम्बधित विभागाकडुन रस्ता दुरुस्ता करुन देण्यात यावा. ही मागणी आता जोर धरु लागली आहे.