वर्धा : विष प्राशन करुन युवतीने आत्महत्या केली. पिपरी (मेघे) परिसरातील गांधीनगर भागात ही घटना घडली. सोनाली अमोल चव्हाण हिने राहत्या घरी उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले होते. तिला सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
येथे उपचार सुरू असताना सोनाली हिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सोनाली हिने उंदिर मारण्याचे औषध का प्राशन केले याबाबतची अधिकची माहिती सध्या रामनगर पोलीस घेत आहेत.